परिस्थितीचे राजकारण न करता एकत्र लढा देऊया - मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
परराज्यातील मजूर, कामगारांनी संयम ठेवावा; राज्य सरकार पूर्णपणे काळजी घेत आहे
केंद्र आणि राज्याने लॉकडाऊन वाढवला आहे पण यात काही आम्हाला आनंद नाही. आपल्याला घरी जाण्याची ओढ असणे स्वाभाविक आहे पण थोडा संयम ठेवा, राज्य सरकार तुमची संपूर्ण काळजी घेत आहे, आणखीही काही यासाठी करावे लागले तर केले जाईल मात्र कुणी या लढाईमध्ये राजकारण करून गैरसमज पसरवू नये असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाईव्ह प्रसारणात सांगितले. ते म्हणाले की कोरोनाचा मुकाबला करण्यात केंद्र सरकार संपूर्ण सहकार्य देत असून विविध पक्षांचे नेतेही बरोबर आहेत.
वांद्रे येथे दुपारी परराज्यातील कामगार, मजूर यांनी गावी जाण्यासाठी गर्दी केली होती त्याचा उल्लेख करून मुख्यमंत्री म्हणाले की रेल्वे सुरु होणार अशा अफवेने लोक जमले. मात्र अस्वस्थ होण्यासारखे काही नाही. तुम्ही आपल्या राज्यात नसलात तरी आपल्याच देशात आहात. आणि तुमची संपूर्ण काळजी घेतली जाईल. या परिस्थितीचा फायदा घेऊन कुणी भावनांशी खेळण्याचे राजकारण केले तर सहन केले जाणार नाही असेही त्यांनी स्पष्ट केले.
सविस्तर वृत्त - https://bit.ly/2V7bQfp
No comments:
Post a Comment