■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत, राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन
मान्सूनचे केरळात आगमन झाले असले तरी अद्याप तो महाराष्ट्रात आलेला नाही. मान्सूनचे महाराष्ट्रात आगमन झाल्यानंतरसुद्धा शेतकऱ्यांनी पेरणीची घाई करू नये, असे आवाहन राज्य सरकारतर्फे करण्यात येत आहे. १ जूननंतर विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात मान्सूनपूर्व सरी कोसळतील, असा अंदाज आहे. परंतु कमाल तापमान अधिकच असेल. या कालावधीत मुंबई आणि कोकणात ढगाळी वातावरण आणि किरकोळ पाऊस पडेल. विदर्भ, मराठवाडा आणि मध्य महाराष्ट्रात वादळ आणि वीजांपासून नागरिकांनी आपले संरक्षण करावे आणि पुरेशी खबरदारी घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.
सविस्तर वृत्त वाचा ...
https://goo.gl/3PzEri
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment