Followers

Tuesday, 29 May 2018

340 koti Rupayache Anudan


महासंवाद : DGIPR NEWS-II दि.२९ मे २०१८ महाराष्ट्रातील उच्च शिक्षण संस्थांना रुसाकडून ३४० कोटी रुपयांचे अनुदान मंजूर राज्याचा उच्च शिक्षणाचा बृहत आराखडा तयार - विनोद तावडे https://goo.gl/VniZ3C पेरणीयोग्य पावसाशिवाय पेरण्या करू नयेत, राज्य सरकारचे शेतकऱ्यांना आवाहन https://goo.gl/3PzEri अमरावती जिल्ह्यातील ढेंगाळा गावाच्या पुनर्वसनास तत्वतः मान्यता - चंद्रकांत पाटील https://goo.gl/kGjvV4 मंजुला माथुर यांच्याकडून ‘बर्ड्स अबोड’ हे कॉफी टेबल बुक राज्यपालांना भेट भारतीय उपखंडातील दुर्मिळ पक्ष्यांचे छायाचित्रण https://goo.gl/C7pR1g ग्राहकांच्या हितास्तव ३५ रू. प्रतिकिलो दराने तूर डाळ विक्रीचा निर्णय - पणनमंत्री सुभाष देशमुख https://goo.gl/vSAkB4

Dgipr news123


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ केंद्र सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन बोंडअळीमुळे कापूस, तुडतुड्यामुळे धान आणि ओखी वादळामुळे मच्छिमार बोटींचे झालेले आर्थिक नुकसान मोठे असून केंद्र सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाला केले. आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पाहणी पथकाची आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कापसावरील बोंडअळीचा फटका राज्यातील २८ जिल्ह्यांना बसला असून तुडतुड्यामुळे सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यातील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने यापूर्वीच ३३७३.३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी विद्यापीठातील संशोधन, नैसर्गिक आपत्तीबाबतची पूर्वतयारी तसेच पीक विम्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. सविस्तर वृत्त वाचा... https://goo.gl/4q5ctq शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा... http://t.me/MahaDGIPR

Friday, 18 May 2018

Dgipr news180518d


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा : महादेव जानकर दिल्ली येथे आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेत समुद्री किनारी राज्य असलेल्या मत्स्यविकास मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली. तसेच मत्स्य क्रांतीसाठी अनुदान निधीची रचना 60:40 या प्रमाणात आहे. ही बदलून त्या ऐवजी 50:50 करण्यात यावी. हार्बर योजनेचा विकास अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी केंद्र आणि राज्याचा वाटा 50:50 प्रमाणात असावा. केंद्राकडून मासेमारी नौकांसाठी मिळणारी डिझेल सबसीडी महाराष्ट्राला मिळत नसून ही सबसीडी महाराष्ट्राला उपलब्ध करून मिळावी, अशा मागण्या जानकर यांनी बैठकीत केल्या सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/sfvh6t शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR

Dgipr careernama180518a


▪️महासंवाद : करिअरनामा▪️ संरक्षण संशोधन व विकास संघटनेत वैज्ञानिकांची भरती पदाचे नाव - सायंटिस्ट’B’ - ४१ जागा 🔅 इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन - २२ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बीटेक (इलेक्ट्रॉनिक्स आणि कम्युनिकेशन) आणि गेट वयोमर्यादा - २६ मे २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 🔅 कॉम्प्युटर सायन्स - १९ जागा शैक्षणिक पात्रता - प्रथम श्रेणी बीई / बीटेक (कॉम्प्युटर सायन्स) आणि गेट वयोमर्यादा - २६ मे २०१८ रोजी २८ वर्षे (इतर मागासवर्गीय उमेदवारांना ३ वर्षे व अनुसूचित जाती- जमातीतील उमेदवारांना ५ वर्षे सवलत) 🔅 ऑनलाईन अर्ज करण्याची शेवटची तारीख - १ जून २०१८ 🔅 अधिक माहितीसाठी - https://goo.gl/rXdBgr 🔅 ऑनलाईन अर्जासाठी - https://goo.gl/4Av1EY ➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR

Dgipr news 180518c


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी २५ किलो मेणाचा वापर करून हा पुतळा बनविला आहे. लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये हा पुतळा ठेवण्यात येणार आहे. यावेळी कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. सविस्तर वृत्त वाचा... https://goo.gl/Qn3Qgw शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा... http://t.me/MahaDGIPR

Dgipr news180518b


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून गावागावात परिवर्तन - मुख्यमंत्री वॉटर कप स्पर्धेच्या माध्यमातून धर्म, जात, गट, पक्ष विसरून पाण्यासाठी लोक एकत्र आले आहेत. त्यामुळे गावागावात परिवर्तन होऊ लागले आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज जत तालुक्यातील बागलवाडी येथे पाणी फाऊंडेशन आणि लोकसहभागातून करण्यात येत असलेल्या जलसंधारणाच्या कामांच्या पाहणी दरम्यान आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्वत: हातात पाटी व खोरे घेऊन श्रमदान केले. सविस्तर वृत्त वाचा... https://bit.ly/2rUirdz शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा... http://t.me/MahaDGIPR

Dgipr news180518a


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या मेणाच्या पुतळ्याचे अनावरण आज मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते मुंबई येथे करण्यात आले. शिल्पकार सुनील कुंडीलूर यांनी २५ किलो मेणाचा वापर करून हा पुतळा बनविला आहे. लोणावळा येथील वॅक्स म्युझियम मध्ये हा पुतळा ठेवण्यात येणार आहे. यावेळी कुंडीलूर यांच्या शिल्पकलेचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. सविस्तर वृत्त वाचा... https://goo.gl/Qn3Qgw शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा... http://t.me/MahaDGIPR