■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
केंद्र सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई देण्याचे मुख्यमंत्र्यांचे आवाहन
बोंडअळीमुळे कापूस, तुडतुड्यामुळे धान आणि ओखी वादळामुळे मच्छिमार बोटींचे झालेले आर्थिक नुकसान मोठे असून केंद्र सरकारने जास्तीत जास्त नुकसान भरपाई द्यावी, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्याच्या दौऱ्यावर आलेल्या केंद्रीय पाहणी पथकाला केले. आज मुंबई येथे मुख्यमंत्र्यांच्या समवेत केंद्रीय पाहणी पथकाची आढावा बैठक झाली. यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, कापसावरील बोंडअळीचा फटका राज्यातील २८ जिल्ह्यांना बसला असून तुडतुड्यामुळे सिंधुदुर्ग, नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, जिल्ह्यातील धान पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. शासनाने यापूर्वीच ३३७३.३१ कोटी रुपयांचा प्रस्ताव केंद्र सरकारला पाठविला आहे. यावेळी केंद्रीय पथकातील अधिकाऱ्यांनी शेतकऱ्यांच्या समस्या, कृषी विद्यापीठातील संशोधन, नैसर्गिक आपत्तीबाबतची पूर्वतयारी तसेच पीक विम्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली.
सविस्तर वृत्त वाचा...
https://goo.gl/4q5ctq
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा...
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment