Followers

Friday, 18 May 2018

Dgipr news180518d


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा : महादेव जानकर दिल्ली येथे आज केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री राधामोहन सिंग यांच्या अध्यक्षतेत समुद्री किनारी राज्य असलेल्या मत्स्यविकास मंत्र्यांची बैठक झाली. या बैठकीत मत्स्य व्यवसायास शेती क्षेत्राचा दर्जा मिळावा, अशी मागणी राज्याचे मत्स्यविकासमंत्री महादेव जानकर यांनी केली. तसेच मत्स्य क्रांतीसाठी अनुदान निधीची रचना 60:40 या प्रमाणात आहे. ही बदलून त्या ऐवजी 50:50 करण्यात यावी. हार्बर योजनेचा विकास अधिक चांगल्या प्रकारे राबविण्यासाठी केंद्र आणि राज्याचा वाटा 50:50 प्रमाणात असावा. केंद्राकडून मासेमारी नौकांसाठी मिळणारी डिझेल सबसीडी महाराष्ट्राला मिळत नसून ही सबसीडी महाराष्ट्राला उपलब्ध करून मिळावी, अशा मागण्या जानकर यांनी बैठकीत केल्या सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/sfvh6t शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment