Followers

Saturday, 28 April 2018

Dgipr news 280418 a

■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■

गर्दीच्या काळात खासगी वाहनांना एसटी बसच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार - दिवाकर रावते

गर्दीच्या हंगामाच्या काळात राज्यातील खासगी प्रवासी वाहने (बस, ट्रॅव्हल्स इत्यादी) त्यांच्या तिकीटदरात अवाजवी वाढ करतात. यामुळे प्रवाशांची होणारी लुबाडणूक थांबविण्यासाठी उच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशानुसार खासगी वाहनांचे भाडेदर निश्चित करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. यानुसार खासगी कंत्राटी वाहनांना आता गर्दीच्या हंगामाच्या काळात एसटी महामंडळाच्या बस भाडेदराच्या तुलनेत जास्तीत जास्त दीडपट भाडे आकारता येणार आहे, अशी माहिती परिवहनमंत्री दिवाकर रावते यांनी दिली आहे. तसेच भाडेदरापेक्षा अधिक भाडे आकारण्यात येत असल्यास मोटार वाहन कायदा / नियमाप्रमाणे संबंधित वाहनाचा परवाना रद्द करण्यात येईल, खासगी वाहनांची मनमानी आणि प्रवाशांची अडवणूक रोखण्याच्या दृष्टीने आजचा शासन निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. राज्यात त्याची काटेकोर अंमलबजावणी केली जाईल, असे रावते यांनी सांगितले.

सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/kBHZMB

शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment