■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांना मोफत गोळ्यांचा पुरवठा राज्यभर सुरु करण्यात यावा - विजय देशमुख
सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री विजय देशमुख यांच्या उपस्थितीत आज मंत्रालयात थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांसाठी काम करणाऱ्या विविध स्वयंसेवी संस्था, थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांचे पालक आणि स्त्रीरोग तज्ञांची FOGSI ही संघटना यांची बैठक संपन्न झाली,
याबैठकीत राज्यभरातील थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांची नेमकी आकडेवारी किती आहे, याची माहिती घेण्यात यावी. या सर्व रुग्णांना त्यांच्या गावाजवळच्या आरोग्य केंद्रात मोफत गोळ्या उपलब्ध होतील यादृष्टीने नियोजन करावे. गोळ्यांची मागणी लक्षात घेऊन त्यापद्धतीने तातडीने नियोजन करण्यात यावे, तसेच थॅलेसेमीयाग्रस्त रुग्णांची कोणतीही गैरसोय नाही याची दक्षता घेण्यात यावी अशा सूचना देशमुख यांनी विभागाच्या संबधित अधिकाऱ्यांना दिल्या.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/nKZssd
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment