■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
‘राज्य फोकस पेपर’ची गावपातळीपर्यंत प्रत्यक्ष अंमलबजावणी करावी - मुख्यमंत्री
नाबार्डच्या माध्यमातून राज्याच्या ग्रामीण आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी या वर्षाच्या तयार करण्यात आलेल्या ‘राज्य फोकस पेपर’ची गावपातळीपर्यंत प्रत्यक्षात अंमलबजावणी होण्यासाठी प्रयत्न करावेत. जलसंधारणासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पातून पाण्याचा वापर अधिक परिणामकारकपणे करण्यासाठी या सर्व प्रकल्पांचे डिजिटायजेशन करण्यासाठी नाबार्डने पुढाकार घ्यावा, असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. आज नाबार्डच्या वतीने मुंबई येथे आयोजित राज्य कर्ज परिसंवादात ते बोलत होते. यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते राज्य फोकस पेपर 2018-19 चे व ई-शक्ती पुस्तिकेचे प्रकाशन करण्यात आले.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/nWUH3j
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment