■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■
इमारतींच्या मानांकनासाठी प्रशिक्षण देण्याबाबत केंद्राच्या ‘ग्रीहा कौन्सिल’ सोबत सार्वजनिक बांधकाम विभागाचा करार
राज्य शासनाच्या सर्व इमारती हरित इमारत (ग्रीन बिल्डिंग) या संकल्पनेनुसार बांधण्याचा निर्णय दोन वर्षापूर्वी घेण्यात आला. या संकल्पनेबाबत इमारतींचे मानांकन करण्याबाबतचे प्रशिक्षण सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांना देण्यासाठी महाराष्ट्र शासन आणि केंद्र शासनांतर्गत ग्रीहा कौन्सिल यांच्यात सार्वजनिक बांधकाम मंत्री चंद्रकांत पाटील यांच्या उपस्थितीत सामंजस्य करार (एम.ओ.यु.) आज करण्यात आला. देशात प्रथमच अशा कराराचा मान महाराष्ट्राला मिळाला आहे. आज झालेल्या करारानुसार ग्रीहा कौन्सिलच्यावतीने सार्वजनिक बांधकाम विभागातील स्थापत्य व विद्युत अभियंते तसेच वास्तू विशारदांना प्रशिक्षण दिले जाणार असून पहिल्या टप्प्यात या प्रशिक्षित अधिकाऱ्यांकडून राज्य शासनाच्या सर्व इमारतींचे ग्रीहा प्रणालीद्वारे मानांकन करण्यात येईल. तसेच यापुढे सर्व शासकीय इमारती पर्यावरण पूरक पद्धतीने कमीत कमी विजेचा वापर, नैसर्गिक प्रकाश आणि हवा आदी बाबींचा उपयोग करुन बांधण्यासह अपारंपरिक ऊर्जेचा वापर करण्यावर भर देण्यात येणार आहे.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/Ykb4hx
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment