Followers

Friday, 11 May 2018

Dgipr news110518M


■ महासंवाद : महत्त्वाची बातमी ■ शेतकऱ्यांच्या भरवश्यावरच राज्याचा डोलारा; त्यांच्या हिताच्या निर्णयांनाच प्राधान्य - मुख्यमंत्री मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राजगुरुनगर-खेड मधील निमगाव, कणेरसर, दावडी, केंदूर या चार गावांशी निगडीत विशेष आर्थिक क्षेत्र (सेझ) रद्द करण्याचा निर्णय घेतला तसेच या जमिनींचे प्रकल्प बाधित शेतकऱ्यांना हस्तांतरण करण्यासाठीचे शुल्कही माफ केले. मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांप्रती घेतलेल्या या संवेदनशील भूमिकेबद्दल संबधित चार गावातील शेतकऱ्यांनी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आज खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा वर्षा निवासस्थानी सत्कार केला. यावेळी ज्यांच्या भरवशावर राज्याचा डोलारा उभा आहे, त्या शेतकरी बांधवांवर कोणत्याही परिस्थितीत अन्याय होऊ नये अशीच शासनाची भूमिका आहे. त्यातूनच शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय घेण्यास प्राधान्य दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले. सविस्तर वृत्त वाचा | https://goo.gl/PZwwS8 ➖➖ शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा.. http://t.me/MahaDGIPR

No comments:

Post a Comment