▪️महासंवाद : महत्त्वाची बातमी▪️
परवडणाऱ्या घरांसाठी नियोजन प्राधिकरण म्हणून आता ‘म्हाडा’ – मुख्यमंत्री
शहरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेला गती येण्यासाठी महाराष्ट्र गृहनिर्माण व क्षेत्रविकास प्राधिकरणास (म्हाडा) नियोजन प्राधिकरण करण्याचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज मुंबई येथे आयोजित बैठकीत दिले. यावेळी राज्यातील विविध शहरात यावर्षी दहा लाख घर बांधणीचे उद्दिष्ट ठेऊन त्या दृष्टीने गृहनिर्माण विभागाने काम करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी संबंधित विभागांना दिले. प्रधानमंत्री आवास योजनेंतर्गत घरे बांधताना किंवा प्रकल्प उभारताना येणाऱ्या पर्यावरणविषयक परवानग्या ‘राईट टू सर्व्हीस ॲक्ट’ अंतर्गत एक महिन्यात देण्यात येतील, असेही यावेळी मुख्यमंत्र्यांनी सुचविले. याबैठकीत म्हाडा, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण या योजनांचे सादरीकरण करण्यात आले. एसआरमध्ये अतिक्रमण हटविण्यासाठी गृह विभागामार्फत ५० अधिकारी कर्मचाऱ्यांचा चमू नियुक्त करण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.
सविस्तर वृत्त वाचा |
https://goo.gl/CC3W41
➖➖
शासकीय बातम्या आणि घडामोडी जाणून घेण्याकरिता आमचे टेलिग्राम चॅनल JOIN करा..
http://t.me/MahaDGIPR
No comments:
Post a Comment